Gold Silver Rates : दरवाढीतून फारसा दिलासा नाहीच; जाणून घ्या आजचे सोन्या- चांदीचे दर
सोन्या चांदीच्या दरात मागील दिवसांपासून फार कमी फरकानं चढ उतार पाहायला मिळत आहे.
Gold Silver Rates : सोन्या चांदीच्या दरात मागील दिवसांपासून फार कमी फरकानं चढ उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सर्व घडामोडी आणि कोरोनामुळं व्यापारावर झालेल्या परिणामांचे थेट पडसाद सोनं आणि चांदीच्या दरांवर दिसून येत आहेत.
'गुड रिटर्न्स'च्या वेबसाईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबईत आजच्या दिवशी, प्रती तोळ्यासाठी सोन्याच्या दरात काही रुपयांची घट झाली आहे. शनिवारी देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये सोन्याचे दर प्रती तोळा 46480 रुपये इतके आहेत. 22 कॅरेट सोन्यासाठीचे हे दर असून, 24 कॅरेटचे दर 47490 रुपये इतके आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर किती?
दिल्ली - 46690
बंगळुरू - 45690
चंदीगढ- 46690
कोलकाता - 48160
नाशिक- 46,480
शनिवारी देशात चांदीचे दर 40 रुपयांनी कमी झाले असून, आता एक किलो चांदीसाठी 71600 रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्या चांदीच्या दरांमध्ये फारशी घट झालेली नसली तरीही हा आकडा काही प्रमाणात उतरला आहे.
कोरोना काळामुळं लागू करण्यात आलेल्या नियमांअंतर्गत विवाहसमारंभांवरही काही निर्बंध आले आहेत. त्यामुळं याचे थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या खरेदीवरही झाले आहेत. लग्नसराईच्या या दिवसांमध्येच लॉकडाऊन लागू असल्यामुळं समारंभ आवरते घेत आर्थिक बचतीलाच सर्वसामान्य प्राधान्य देत असल्यामुळं सराफा बाजार थंडावल्याचं चित्र आहे.