(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol-Diesel Price : पेट्रोल शंभरी पार तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर, मे महिन्यात 15 व्या वेळेस इंधन दरवाढ
Petrol Diesel price : देशात आज पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 33 पैशांनी महागलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोल शंभरी पार गेलं असून डिझेलच्या किंमतीही शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहेत.
मुंबई : मे महिन्यात 15 व्या वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100 रुपयांवर होत असलेली मुंबई ही देशातील पहिली मेट्रो सिटी बनली आहे. परभणीत सर्वाधिक म्हणजे 102.57 रुपयांने पेट्रोलची विक्री होत असून डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे.
मुंबईत पेट्रोल आज 100.19 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 93.94 रुपये तर डिझेल 84.89 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 93.97 रुपये आणि डिझेल 87.74 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 89.65 रुपये प्रति लिटर आहे.
परभणी जिल्ह्यात आज पुन्हा इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 33 पैशांनी महागले आहे. परभणीत पेट्रोलची किंमत 102. 57 रुपये असून डिझेलची किंमत 93.05 रुपयांवर पोहोचली आहे. पेट्रोलपाठोपाठ डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे.
महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशसह अन्य काही शहरांमध्ये पेट्रोलनं 100 रुपये प्रति लिटरचा आकडा आधीच पार केला आहे. प्रीमियम पेट्रोलच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून 100 रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक झाल्या आहेत. मे महिन्यात आतापर्यंत 13 दिवसांनी दर बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. मे महिन्यात झालेल्या 15 व्या वाढीमुळे दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 3.28 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेलमध्ये 3.88 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढून 69 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. ओएमसीला आणखी काही काळ किंमतींमध्ये सुधारणा करावी लागू शकते. अमेरिकेचे निर्बंध कमी करण्यात उशीर झाल्यानंतर इराण तेलाच्या व्यापारात परत आला आहे. त्यामुळे जागतिक तेलाच्या किंमतीही स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, व्हॅट आणि फ्रेट शुल्कासारख्या स्थानिक करांमुळे इंधनाचे दर राज्यात वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक येतो. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांत प्रमाणित इंधनाची सरासरी किंमत आणि विनिमय दराच्या आधारे दररोज किंमती बदलल्या जातात.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Corona Vaccination : मुंबई महापालिकेकडून लसीकरणासाठी सुधारित नियमावली; परदेशा जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा
- Pfizer : युरोपमध्ये मिळणार 12 ते 15 वयोगटातील बालकांना लस, Pfizer-BioNTech ला मंजुरी
- Mount Everest : अनंत अमुची ध्येयासक्ती...आजच्या दिवशी एडमंड हिलरी आणि तेनजिंग नॉर्गे यांची एवरेस्ट मोहीम फत्ते