एक्स्प्लोर

लालबागमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; लग्नकार्य असलेल्या घरात दुर्घटना, 16 जण जखमी

मुंबईतील लालबाग परिसरातील साराभाई मेन्शमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला असून स्फोटात 16 जण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या घरात स्फोट झाला त्या घरामध्ये लग्नकार्य आहे.

मुंबई : लालबागमधील साराभाई मेन्शमधील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झालानं 16 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे. सकाळी सात वाजल्याच्या सुमारात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या घरात स्फोट झाला त्या घरामध्ये लग्नकार्य आहे. साराभाई मेन्शमध्ये राहणाऱ्या राणे कुटुंबियांच्या घरात त्यांच्या मुलीचं लग्न असून आज हळदीचा कार्यक्रम होता.

मुंबईतील लालबाग परिसरातील साराभाई मेन्शमध्ये वास्तव्याला असणाऱ्या राणे कुटुंबियांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. राणे यांच्या मुलीच्या लग्न असून आज हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी घरात बरीच पाहुणे मंडळी उपस्थित होती. अशातच सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅल गळती सुरु झाली आणि सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबप्रमुख मंगेश राणे गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळत आहे. यातील 12 जणांवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लग्नकार्य असलेल्या घरात सिलेंडर स्फोट झाल्यामुळे घराची पडझड झाली असून सामानचंही नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर स्फोटाची तीव्रता एवढी होती की, आजूबाजूच्या घरांचंही नुकसान झालं आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीत आजूबाजूच्या घरांतील कपड्यांसह इतर सामानही जळून खाक झालं आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही वेळातच अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्फोट झालेल्या घराची पाहणी केली. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, '2013 साली एक ठराव मांडला होता की, केवळ सोसायट्यांनाच नव्हे तर सर्व इमारतींमध्ये गॅस पाईपलाईन दिली पाहिजे. त्यामुळे गॅस गळती किंवा स्फोटाची शक्यता कमी असते.' पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'या प्रकरणी अधिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

महत्त्वाच्या बातम्या

पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, मी शिवसेनेसोबतच ठाम, सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण
पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, मी शिवसेनेसोबतच ठाम, सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget