एक्स्प्लोर
विरारमध्ये मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, एक आरोपी गजाआड
आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने तसेच काहीच पुरावा नसल्याने आणि अंधारात मुलीने आरोपींना नीट बघितलं नसल्याने पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यात अडचणी येत होत्या.
विरार : विरारमध्ये आपल्या मित्राबरोबर निर्जन स्थळावर बोलत बसलेल्या मुलीच्या मित्राला झाडावर बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका नराधमाला विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेनंतर सदर आरोपी आपल्या गावी अकलूजला हा लपला होता. तिथून त्याला पोलिसांनी पकडून आणलं आहे. त्याचा एक साथीदार मात्र फरार आहे. त्याला पकडण्यासाठी विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे.
15 एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान विरारच्या जीवदानी रोडवरील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या मागील सुनसान रस्त्यावरून 15 वर्षाची पीडित मुलगी आपल्या मावस बहिणीकडे जात होती. तेवढ्यात तिला तिचा मित्र भेटला. ते दोघे बोलत असताना दोन अज्ञात इसमांनी पीडित मुलीच्या मित्राला मारहाण करत झाडाला बांधून ठेवलं.
त्या मुलीला झुडपात नेवून तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. विरार पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष टीम स्थापन केली आहे.
घटनास्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने तसेच काहीच पुरावा नसल्याने आणि अंधारात मुलीने आरोपींना नीट बघितलं नसल्याने पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यात अडचणी येत होत्या. मात्र खबरीमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या आरोपींचा शोध लागला. त्यातील एक आरोपीला पोलिसांनी अकलूज येथून अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अजून फरार आहे. लवकरच तो पकडला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement