एक्स्प्लोर
मुंबईत घरफोड्या करणाऱ्या चोरांची टोळी अटकेत
रिक्षाचालकांचा वेश घेऊन सराईतपणे चोरी करणाऱ्या एका टोळीला विलेपार्ले पोलिसांनी आज (शुक्रवार) अटक केली.

मुंबई : रिक्षाचालकांचा वेश घेऊन सराईतपणे चोरी करणाऱ्या एका टोळीला विलेपार्ले पोलिसांनी आज (शुक्रवार) अटक केली. काही हत्यारं बाळगत ही टोळी संधी मिळताच इमारतींमध्ये घुसून चोरी करत असे. अवघ्या काही मिनिटातच हे चोर चोरी करुन पसारही व्हायचे. ज्या घरात कुणी नाही हे हेरुन त्या घरांमध्ये दुपारच्या वेळी ते चोरी करायचे. या टोळीतील काही जण घरात चोरी करत असताना त्यांचे इतर साथीदार खाली थांबून पहारा द्यायचे. आतापर्यंत त्यांनी अनेक घरांमध्ये चोरी केल्याचं समजतं आहे. 8 मे रोजी अजय भोज हे सिनेमा पाहण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत गेले असताना या टोळीनं त्यांच्या घरात घुसून 4 लाख किंमतीचे दागिने आणि काही रक्कम लंपास केली होती. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून या टोळीतील चौघांना अटक केली. हिमांशू सोमय्या, अय्यपा शेट्टीयार, दिनेश यादव आणि सुनील शेट्टी अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. त्यामुळे घराबाहेर जाताना योग्य ती काळजी घेण्याचं पोलिसांनी आवाहन केलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























