एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ग्राहकांच्या भीतीचा गैरफायदा घेत जाहिरात, पतंजलीला FDA चा दणका
कोलेस्ट्रॉलमुक्त तेल/ झीरो कोलेस्ट्रॉल खाद्यतेलाच्या जाहिरातीवर एफडीएने आक्षेप घेतला आहे.
मुंबई : योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली तसंच इमामी कंपनीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. कोलेस्ट्रॉलबाबत ग्राहकांच्या मनातल्या भीतीचा गैरफायदा घेत कोलेस्ट्रॉलमुक्त/ झीरो कोलेस्ट्रॉल खाद्यतेलाची जाहिरात केल्याने, एफडीएने पतंजली आणि इतर कंपन्यांविरोधात नागपूरमधील न्यायनिर्णय अधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली आहे. संबंधित गुन्हा सिद्ध झाल्यास पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉलमुक्त तेल/ झीरो कोलेस्ट्रॉल खाद्यतेलाच्या जाहिरातीवर एफडीएने आक्षेप घेतला आहे. खाद्यतेल वनस्पती जन्य तेलबियांपासून तयार केलं जातं. त्यामुळे खाद्यतेलांमध्ये कोलेस्ट्रॉल असणं शक्यच नाही. कोलेस्ट्रॉल फक्त प्राणीजन्य अन्नपदार्थ जसे दूध, दुग्धजन्य पदार्थ, चिकन, मटण, मासे इत्यादीत असते. कोणत्याही खाद्यतेलांमध्ये कोलेस्ट्रॉल नसतंच. केवळ ग्राहकांच्या मनातल्या कोलेस्ट्रॉलविषयीच्या भीतीचा गैरफायदा घेत, कोलेस्ट्रॉल फ्री/झीरो कोलेस्ट्रॉल खाद्यतेलाच्या जाहिराती केल्या जातात, असं एफडीएचं म्हणणं आहे.
कोलेस्ट्रॉल हे प्रत्येक माणसाच्या शरीरात प्रतिदिन 2000 मिली ग्रॅम तयार होतं. जे हार्मोन सिक्रेशन आणि इतर शारीरिक कामांसाठी आवश्यक आहे. असं असताना हेतुपुरस्सर कोलेस्ट्रॉल फ्री/झीरो कोलेस्ट्रॉल खाद्यतेल, अशी जाहिरात करणं कायद्याच्या कलम 24 नुसार अनफेअर ट्रेडप्रॅक्टिसेसमध्ये मोडतं, असंही एफडीएने म्हटलं आहे.
पतंजलीने रिफाईंड सोयाबीन ऑईल, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल, पतंजली व्हर्जिन ऑईल आणि पतंजली एक्स्ट्रा व्हर्जिन ग्राऊंडनट ऑईल या खाद्यतेलांच्या लेबलवर "कोलेस्ट्रॉल फ्री' आणि "झीरो कोलेस्ट्रॉल' असं लिहिले आहे.खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने यात कोलेस्ट्रॉल हा घटक नसल्याचं, अन्न व औषधी प्रशासन विभागाचं म्हणणं आहे.
या कंपनीने अन्नसुरक्षा मानक कायद्याचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाल्याने, खाद्यतेलात नसलेल्या घटकाचा उल्लेख जाहिरातीत केल्याप्रकरणी एफडीएने पतंजलीविरोधात नागपूरमधील न्यायनिर्णय अधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली आहे. संबंधित गुन्हा सिद्ध झाल्यास पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
तसंच, अशाच प्रकारची आक्षेपार्ह जाहिरात इमामी अॅग्रोटेक लिमिटेडद्वारे उत्पादित होणाऱ्या कच्ची घनी मस्टर्ड ऑईल, रिफाईंड सोयाबीन ऑईल, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल, रिफाईंड राईस ब्रान ऑईल यावरही आढळून आल्याने, इमामीलाही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसचं उत्तर समाधानकारक नसल्याने इमामवरही लवकरच दंडात्मक कारवाई केली जाईल, असं एफडीएने सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement