एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिलेले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांच्या 'ही कसली वचनपूर्ती' या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीवरच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई : मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. मात्र मुख्यमंत्री पदाला शोभणारी वक्तव्यं त्यांनी केली. गेल्या वर्षभरात या सरकारने काहीच साध्य केलेलं नाही. सामनाला दिलेल्या मुलाखतीत विकासावर चर्चा नाही तर फक्त धमकवण्यासाठी दिलेली वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिलेले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांच्या 'ही कसली वचनपूर्ती' या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीवरच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणारे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. राग किंवा द्वेषाशिवाय या शपथेचे पालन मुख्यमंत्री करत नाहीयेत. 'हात धुवून लागेन आणि पाय धुवून मागे लागेन' ही वक्तव्ये त्यांना शोभत नाहीत, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, ते कितीही एकत्र आले तरी शेवटी जनतेनं सरकार कसं चाललंय हे पाहिलेलं आहे. हे कितीही एकत्र आले तरी मनाने एकत्र येऊ शकत नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतही हे एकत्र येत असतील याचा अर्थ आमची ताकद वाढते आहे. विजेच्या प्रश्नावर या सरकारने ऐतिहासिक घुमजाव केलेलं आहे. बदल्यांचे दलाल ज्या प्रकारे फिरतायत अशी अवस्था पूर्वीच्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात पण पाहायला मिळाली नव्हती, असं ते म्हणाले.

आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही ते म्हणाले की, न्यायालयाच्या या दोन निर्णयामुळे कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन होऊन राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी योग्य उदाहरणं आहेत. पण आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्ही रस्त्यावर उतरूयामध्ये कोणावर कारवाई होणार? गृहमंत्री, मुख्यमंत्री की अवैध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार हे सुनिश्चित झाले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, पाच वर्षे खुशाल सरकार चालवा, पण गव्हर्नन्स दाखवा. हे सरकार विश्वासघातातून जन्माला आलंय. स्थगिती ही एकमेव या सरकारची उपलब्धी आहे.

ते म्हणाले की, आरे कारशेडचं सत्य मुंबई भाजप प्रत्येक मुंबईकरांपर्यंत पोहचवणार आहे. काही अधिकारी आपल्या फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांचा 'इगो मसाज' करतायत, असा आरोपही फडणवीसांनी केला.

अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या सर्व मतांशी आम्ही सहमत नाही फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. काल न्यायालयाचे आलेले दोन निर्णय यात त्यांची कारकीर्द दिसून येते. अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या सर्व मतांशी आम्ही सहमत नाही. पण सरकारविरोधी विचार मांडल्यावर ते चिरडून टाकू याच्याशी आम्ही सहमत नाहीत, असं ते म्हणाले. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने चपराक दिल्याने तरी हे सुधरतील का? की आता न्यायालयांना 'महाराष्ट्रद्रोही' ठरवणार? असा सवाल फडणवीसांनी केला.

आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्र्यांचा उल्लेख कुठल्या परिपेक्षात केला ते दुसऱ्या दिवशी स्पष्ट केलं आहे. आमच्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीतील सरकार सारखा असमन्वय नाही, असंही फडणवीस म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget