एक्स्प्लोर

Waterfall : पालघरमधील अतिदुर्गम जव्हारमधील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे फेसाळले

पालघरमधील जव्हार अति दुर्गम भाग असला तरीही येथील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे मनमोहक आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनत चालले आहेत.

Palghar Dabhosa and Hivarpada Waterfall : मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्ह्यामधील जव्हार हे मिनी महाबळेश्वर समजलं जातं. पावसाळा सुरु झाला की येथील वातावरण रमणीय बनते. जव्हार भागातही पर्यटन स्थळं आहेत तजी पर्यटकांना भुरळ घालत असतात. हा अति दुर्गम भाग असला तरीही येथील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे मनमोहक आहेत. तालुका अतिदुर्गम असला तरी मात्र निसर्गाच्या कुशीत वसलेले हे धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनत चालले आहेत .

जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून 15 ते 20 किमीवर असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेले दाभोसा आणि हिरडपाडा हे धबधबे. धबधब्याची ऊंची किमान 300 फूट आहे. सध्या पर्यटकांची गर्दी या दाभोसा या गावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई तसंच गुजरात, नाशिक आणि सिल्वासामधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा बाराही महिने सुरु असल्याने पावसाळा नसतानाही पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो. मात्र वर्षाऋतुमध्ये धबधब्याच्या बाजूला असलेली हिरवाई दिसत असल्याने या दोन्ही धबधब्यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसते आणि यामुळे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येथे येताना पहायला मिळतात.

दाट धुके आणि कोसळणारे धबधबे हे इथलं वैशिष्ट्य. नजर जाईल तिथे हिरवाईच हिरवाई दिसत असल्याने बाराही महीने वातावरण प्रसन्न असतं. दाभोसा आणि हिरड पाडा या धबधब्यात जेवढ्या वेगाने आणि उंचीवरुन हे पाणी खाली पडत तितक्याच वेगाने त्याचे तुषार 50-60 फुटांपर्यंत वर उडतात. हे न्याहाळताना बालपणीच्या आठवणींत हरवूनन जायला होतं. चारही बाजूने डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, सर्वत्र जंगल आणि नीरव शांतता तसंच धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा खळखळाट हे दृश्य खुप मनोहारी आणि विलोभनीय असल्याने पर्यटकांकडून वेगळंच समाधान व्यक्त केल जातं.

इतर महत्त्वाचे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget