Coronavirus | धारावीतील सर्व कोरोनाबाधितांचं निजामुद्दीन मरकज कनेक्शन समोर
मुंबईतील धारावीत आजपर्यंत सापडलेल्या सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कनेक्शन समोर आलं आहे. धारावीतील सर्व 13 जण हे मरकजमधून परतलेल्यांच्या संपर्कात आले होते
मुंबई : राज्यात विशेषत: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील अनेक परिसर सील करण्यात आहे. वरळी, धारावी हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकट्या धारावीत कोरोनाचे 13 रुग्ण सापडले आहेत. या सर्व कोरोनाबाधितांचं निजामुद्दीन मरकज कनेक्शन आहे.
धारावीतील हे सर्व 13 रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमातून परतलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे धारावीतील सर्व कोरोनाबाधितांना मशिदीतून लागण झाल्याचं कळतं.
निजामुद्दीन मरकजमुळे कोरोनाचा अधिक फैलाव दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातच्या मरकजमुळे कोरोनाबाधितांच्या आकड्या वेगाने वाढ झाली असं आरोग्य मंत्रालयानेही म्हटलं आहे. देश विदेशातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर हे विविध राज्यांमध्ये गेले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धारावीत सापडलेले सर्व कोरोनाबाधित हे निजामुद्दीन मरकजमधून परतलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले आणि त्यांना मशिदीतून कोरोनाची लागण झाल्याचं कळतं.
निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धारावीत दोघांचा मृत्यू दरम्यान धारावीत काल (8 एप्रिल) एकाच दिवसात सहा कोरोनाचे रुग्ण आढळले. इथे आतापर्यंत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल एका 64 वर्षीय व्यक्तीचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला तर त्याआधी 56 वर्षीय व्यक्तीने सायन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.
धारावीत जवळपास 15 लाख लोक छोट्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. 10 बाय 15 च्या घरात 10 ते 15 लोक राहतात. परिणामी हा शहरातील सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. धारावी लघु उद्योग आणि लेदर इंडस्ट्रीसाठीही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवणं कठीण आहे. धारावीतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
Nizamuddin Markaz case | अजित डोवाल यांना भेटल्यावर मौलाना कुठे पळाले? : गृहमंत्री अनिल देशमुख