एक्स्प्लोर

निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकज या धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राज्यात असे कार्यक्रम होऊ न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.

मुंबई : निजामुद्दीनसारखे प्रकरण राज्यात खपवून घेणार नाही. कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असताना दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या 'मरकज' कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले.

या घटनेनंतर निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम 'मरकज' बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी

बाजारांमध्ये गर्दी दिसता कामा नये मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास दुकाने उघडी ठेवली आहेत. मात्र, काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत, असे दिसते. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत ,त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या.

दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील

मरकज म्हणजे काय? दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे 'मरकज' (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत 'संस्थान' असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा- पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठं-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात, अशी माहिती तिथं द्यावी लागते) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते. (ही माहिती पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम समाजातील अभ्यासू व्यक्तीकडून घेतलेली आहे.

Nizamuddin Markaz | मरकज कार्यक्रमातील लोकांचा शोध सुरू, मुंबईत 32 तर पुण्यात 106 जण आढळले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaJammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्कीChhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Embed widget