एक्स्प्लोर

Rajya Sabha Election : शिंदेची शिवसेना दुसरा उमेदवार देणार नाही, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध!

Rajya Sabha Election 2026 : महायुतीकडून एकून सहा अर्ज तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या रुपाने एक अर्ज दाखल झाल्याने सात जागांसाठीची ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. 

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी ट्विस्ट आला आहे. दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिला आहे. ज्योती वाघमारे यांनी अर्ज सादर केला असून रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील सात जागांसाठी अखेर सात अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे सहा अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं समोर आलं आहे. 

शिंदेंनी दुसरा उमेदवार दिला नाही

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मते तर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त तीन मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दुसरा उमेदवार देणार आणि शरद पवारांपुढे आव्हान निर्माण करणार असं चित्र होतं. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला नाही आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली. 

शरद पवार-पार्थ पवारांचे दोन अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकादा अर्ज जरी चुकून बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहणार आहे. 

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना हजर राहता आलं नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आजारी व्यक्ती राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकला नाही अशी पहिलीच घटना घडली. 

Maharashtra Candidate List Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी? 

भाजपचे उमेदवार- (BJP Rajya Sabha Election Candidate List)

  • रामदास आठवले (Ramdas Athawale) 
  • विनोद तावडे (Vinod Tawde) 
  • माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate) 
  • रामराव वडकुते (Ramrao Wadkute) 

शिवसेना शिंदे गट-

  • ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-

  • पार्थ पवार (Parth Pawar)

महाविकास आघाडी - शरद पवार (Sharad Pawar)

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget