स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर
राज्यातील आगामी महापालिका, जिल्हापरिषद आणि नगपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील आगामी महापालिका, जिल्हापरिषद आणि नगपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही सगळ्यात मोठी परीक्षा असणार आहे.
राज्यात 5 महापालिका, 2 जिल्हापरिषद, 3 नगरपरिषद व 65 नगरपंचायतीच्या मुदती संपलेल्या आहेत. या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. राज्यात आघाडी सरकार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चुरस होती. राज्यातील नंबर एक क्रमांकाचा पक्ष होण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत होते.
मात्र, 2014 नंतर राज्यातील राजकारण पूर्ण बदलले. काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक मोठे नेते हे 2019 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार परत येणार म्हणून भाजपमध्ये गेले. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. असे असले तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात काही न काही कुरबुरी सुरूच असतात. कोणाला किती जागा मिळणार इथूनच या तिन्ही पक्षात चढा ओढ असते.
Urmila Matondkar Joins Shiv Sena | उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन
अशावेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांची आघाडी होणार का? झाली तर जागा वाटपावरून पुन्हा राजकारण तापणार असल्याचं चिन्ह आहे. त्यात त्यांचे विरोधक भाजप. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसने तरी या निवडणुकीसाठी आतापासून सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राज्यात फिरत होते, जमेल तितके पक्ष एकत्र आले पाहिजेत म्हणून पक्षातील गट एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसकडून विशेष समितीची स्थापना
या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात तर उपाध्यक्ष यशोमती ठाकूर आहेत. तेरा सदस्यीय समिती असून त्यात समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश पातळीवरील या कमिटीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
Thackeray Sarkar | ठाकरे सरकारची वर्षपूर्ती, सरकारच्या कामगिरीबद्दल तरुणाईला काय वाटतं?