एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी कोणाकोणाला मिळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019'ची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे.
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या काही अटीशर्तींची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. यानुसार या कर्जमाफीची अमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटींची गरज नसल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र, ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीसाठाही काही अटीशर्ती असल्याची माहिती हाती लागील आहे.
कर्जमाफीसाठी या असतील अटी -
- शेतकरी कर्जमाफी करताना आधार कार्डचा 'आधार'; आधारकार्डला जोडलेल्या खात्यात कर्जमाफीचे थेट पैसे येणार.
- शेतकर्यांना कोणतीही अट नाही
- मंत्री, आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी यांना कर्जमाफी मिळणार नाही
- मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना लाभ मिळणार
- कर्जमाफीसाठी शेतकर्यांना अर्ज करण्याची गरज नाही
- बँकांकडून शेतकर्यांच्या खात्यांची माहिती घेणार
- भाजप सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा मोठी कर्जमाफी
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. मार्च 2020 पासून योजनेची अमलबजावणी होणार आहे.
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन -
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांनासुध्दा प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत सरकार योजना जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. राज्याची वित्तीय स्थिती चांगली असो अथवा नाजूक असो, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही योग्य ते निर्णय घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्या वतीने भरुन त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कम सुध्दा या योजनेसाठी पात्र असेल.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, कर्जमाफीवरुन फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Loan Waiver | शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार : मुख्यमंत्री | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement