एक्स्प्लोर

शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी; उद्धव ठाकरेंची घोषणा

नागपूर : शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बदलतं हवामान, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या त्रासातून शेतकऱ्याला मुक्ती देण्यासाठी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात केली. मार्च 2020 पासून याची अमलबजावणी करण्यात येणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांच्यासाठीही चांगली योजना आम्ही राबवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना पारदर्शकपणे राबवली जाणार असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहे. कोणत्याही अटीशर्ती विना ही कर्जमाफी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांचा सभात्याग - उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं, मग आता दोन लाखापर्यंत कर्जमाफी का दिली? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं - राजू शेट्टी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 2019 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा वास्तविक पाहता बरोबर नाही. कारण राज्यात दुष्काळ त्यानंतर नापिकी, महापूर, ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीककर्जाची मुदत 30 जून 2020 आहे. त्यामुळं थकबाकी जाण्याचा विषयच नव्हता. त्यामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्या पिकांना ना कर्जमाफी मिळाली ना फायदा मिळाला. त्यामुळं त्यांचं नुकसान झालं, बर्बाद झाले ते वंचित राहिले. नेमकी ही कर्जमाफी कुणाला मिळणार हा प्रश्न आहे. याबाबत आकडेवारी तपासावी लागेल. यात किती लाभधारक बसतात. पण नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जर असेल तर ते शेतकरी या योजनेत बसणारच नाहीत. हेही वाचा - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Loan Waiver | शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार : मुख्यमंत्री | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget