एक्स्प्लोर
एमपी मिल प्रकरणात मुख्यमंत्री चौकशीला सामोरे जाणार : सूत्र
आपल्याकडे संशयाचा रोख नको, यासाठी लोकायुक्तांच्या चौकशीला तोंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबई : एम पी मिल घोटाळ्याप्रकरणी गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एम पी मिल घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री मेहतांना पाठीशी घालत असल्याची ओरड होत आहे.
मेहता यांनी एमपी मिल प्रकरणाच्या फाईलवर 'मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे' असा शेरा लिहिला होता. आपल्याकडे संशयाचा रोख नको, यासाठी लोकायुक्तांच्या चौकशीला तोंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रत्यक्षात लोकयुक्तांना कोणतेही विशेष अधिकार नसल्याचं समोर आलं आहे.
एमपी मिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी मेहता फाईलवर थेट मुख्यमंत्र्यांचं नाव दिल्याचं खुद्द मेहता यांनी सांगितलं आहे. आरोपांनंतर मेहता यांच्या राजीनाम्याचं नाट्यही रंगलं होतं.
लोकायुक्त नावापुरते
एकूणच राज्यातील लोकायुक्त फक्त नावालाच लोकायुक्त असल्याचं चित्र आहे. अशावेळी लोकायुक्तांच्या चौकशीतून काही निष्पन्न होईल का, की ही चौकशी पण एक फार्स आहे. तसंच जे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना लोकायुक्ताला जास्त अधिकार द्यावे यासाठी झगडत होते, तेच आता कमजोर लोकायुक्तांकडे भ्रष्टाचारी चौकशी करायला का देत आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.
संबंधित बातम्या
प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे
सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे
विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता
मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री
'माझा'च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांना न सांगताच 'अवगत' शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement