एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Worli Pattern | 'वरळी पटर्न' देशभर राबवण्याची शक्यता; केंद्रीय पथकाकडून कौतुक
वरळीतील कोळीवाडा सारख्या दाटवस्तीतल्या प्रदेशात प्रशासनाने कोरोनाला रोखण्यात यश मिळवलं आहे. प्रशासनाच्या या कामाचं कौतुक केंद्रीय पथकानेही केलं आहे. या वरळी पटर्नचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईत इतर ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसराच्या तुलनेनं जी दक्षिण विभागाने कोरोनाला चांगलीच फाईट दिलीय. म्हणूनच जी साऊथमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कोरोना वाढीचा वेग मंदावलाय आहे. या ठिकाणी महापालिकेने राबवलेला 'वरळी पॅटर्न'ची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. केंद्राच्या पथकानेही या पटर्नचं कौतुक केलंय. वरळीत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत या कोरोनाला रोखण्यात यश मिळवलं आहे. वरळीतील कोळीवाडा सारखा दाट वस्तीचा प्रदेश पूर्णपणे सील करण्यात आला आहे. सोबतचं NSUI मध्ये 500 बेडचं क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात आलं आहे.
मुंबईतील अनेक दाटवस्तीच्या प्रदेशांपैकी वरळीतील कोळीवाड्याचा नंबर लागतो. हा 50 हजारांहून जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. येथील घेरांची रचनाही अगदी दाटीवाटीची आहे. त्यामुळे या ठिकाणी जर कोरोना वाढला असता तर वरळीमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. कोळीवाड्यात अगदी सिलींडरपासून दुधापर्यंत सर्व गोष्टी घरपोच देण्यात येत आहेत. परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाला रोखून ठेवण्यात आतापर्यंत यश मिळालं आहे. NSUI मध्ये 500 बेडचं क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी रुग्णांना खूप चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. गरम पाणी, जेवण या सर्व गोष्टींसोबत रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी योगाचेही प्रशिक्षण इथं दिल्यात जातंय.
मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा निर्णय चार दिवसात : भास्कर जाधव
केंद्रीय पथकाकडून प्रशासनाचं कौतुक
वरळीत कोळीवाडा हा लोकसंख्येची घनता जास्त असलेला प्रदेश आहे. तरीही प्रशासनाने इथली परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. याबद्दल केंद्राच्या पथकानेही प्रशासनाचं कौतुक केलं आहे. जी दक्षिण विभागाच्या कामगिरीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाबासकीची थाप दिली आहे. वॉर्ड अधिकारी शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम काम करत आहे. केंद्राचं दुसरं पथकही वरळी भेट देऊन गेले, त्यांनीही प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं आहे. हे पथक वरळी पटर्नचा अहवाल केंद्राकडे पाठवणार आहेत. तर, महापालिका राज्य सरकारकडे याचा आराखडा पाठवणार आहे.
Coronavirus Worli Pattern | कोरोनाला रोखण्यासाठी 'वरळी पॅटर्न' देशभरात राबवणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement