एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भायखळा जेलमधील 78 महिला कैद्यांना विषबाधा
आज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर काही महिला कैद्यांनी पोटदुखी, उलट्या होण्याच्या तक्रारी केल्या. हळूहळू कैद्यांच्या तक्रारी वाढ झाली. त्यानंतर जेल प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केलं.
मुंबई : मुंबईतील भायखळा जेलमध्ये 78 महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व महिला कैद्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आज सकाळी नाश्त्यानंतर काही महिला कैद्यांनी पोटदुखी, उलट्या होण्याच्या तक्रारी जेल प्रशासनाकडे केल्या. हळूहळू कैद्यांच्या तक्रारीत वाढ झाली. त्यानंतर जेल प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केलं.
आत्तापर्यंत 78 कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कैद्यांना सकाळच्या नाश्त्यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. याबाबत जेल प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार एका महिला कैद्याला कॉलरा झाला होता. त्यावेळी सर्व कैद्यांना प्रतिबंधात्मह गोळ्या देण्यात आल्या होत्या. या देण्यात आलेल्या गोळ्या आणि दूषित अन्न या दोन्ही गोष्टींमुळे आजची घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एका महिला कैद्याने एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement