एक्स्प्लोर
'सुरज'चा अंधकार, मुंबईतील बोगस यूपीएससी टॉपरची पोलखोल
मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या बोगस यूपीएससी टॉपरचा पर्दाफाश झाला आहे. यूपीएससी टॉपर असल्याचा बनाव करणाऱ्या सुरज कणसेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दहा बाय दहाच्या खोलीत राहून यूपीएससी परीक्षेत टॉपर आला म्हणून सुरज कणसेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. झोपडपट्टीतल्या कोंदट खोलीत राहून प्रयत्नांच्या जोरावर यूपीएससीसारखी मोठी परीक्षा यशस्वीरित्या पार केल्याने विविध नेत्यांनी सुरजचा सत्कारही केला. मात्र या सुरजचं सत्य सूर्यप्रकाशात आलं आहे.
मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी असलेल्या नवनाथ चव्हाण यांना सुरजने हुशार असल्याचं भासवलं. मोठा अधिकारी होण्याची इच्छा बोलून दाखवल्यावर त्यांनी सुरजचा आर्थिक खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.
गेल्या 2 वर्षांपासून मदत म्हणून चव्हाण सुरजवर लाखो रुपये खर्च करत होते. सुरजनं बनावट सर्टिफिकेट तयार केली आणि चव्हाणांना दाखवली. त्यामुळे घाटकोपरमध्ये त्याचा मोठा बोलबाला झाला. झोपडपट्टीत राहून मोठं यश मिळवल्याबद्दल घाटकोपरमध्ये त्याचे पोस्टरही लागले. सर्वच राजकीय पक्षांनी त्याला सत्कारासाठीही बोलवलं होतं.
काही दिवसात सुरजची ही सर्टिफिकेट बोगस असल्याचं नवनाथ चव्हाण यांच्या लक्षात आलं. त्यांनंतर चव्हाणांनी त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. अखेर पोलिसांनी सुरजला बेड्या ठोकल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement