मुंबईत 2008 सालच्या बॅचला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 400 हून अधिक पोलीस बांधवांचे रक्तदान
मुंबईत 2008 साली भरती झालेल्या पोलीस बॅचला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 400 हून अधिक पोलीस बांधवांना रक्तदान केलं. विशेष म्हणजे यात काहींच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेतला होता.
मुंबई : 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या एका घोषवाक्यावर हे पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असतात. मात्र, आज या पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑफ ड्युटी सुद्धा समाजाप्रती आपलं कर्तव्य बजावले आहे. 2008 साली भरती झालेल्या बॅचला आज 11 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त या बॅचने सामाजिक बांधिलकी जपत रक्तादान केले आहे. या उपक्रमात 400 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तादान केले. कोरोना संसर्गामुळे सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बॅचचं सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे यावेळी काही पोलीस कुटुंबातील सदस्यांनीही रक्तदान केलंय.
मुंबई पोलीस दलातील सन 2008 मुंबई बॅचला जून 2020 मध्ये 11 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी नायगाव पोलीस मैदानात या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रक्तदान करण्यासंदर्भात केलेल्या आवाहनानंतर, हा दिवस रक्तदान करून साजरा करण्याचा निर्णय या बॅच ने घेतला होता. त्यासोबत या बॅचने मुंबई पोलीस आणि इतर अधिकारी यांनाही रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं. त्यामुळे आज म्हणजे सहा जून रोजी नायगवतील पोलीस मैदानावर सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. पोलिसांबरोबर इतर नागरिकांनी देखील रक्तदान करण्यासंदर्भात या पोलीस बॅचकडून आवाहन करण्यात आलं होतं. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या वेळेस फक्त पोलिस कर्मचाऱ्याने नाही तर त्यांच्या कुटुंबातील सभासदांनी सुद्धा रक्तदान केले.
मुंबईत गरज भासल्यास खासगी रुग्णावाहिका ताब्यात घेणार; पालिकेची हायकोर्टात भूमिका
400 हून अधिक जणांचे रक्तदान दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी या बॅचकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. समारंभ आयोजित केले जातात. मात्र, यावर्षी त्याच पैश्यांनी रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे एकीकडे पोलीस रस्त्यावर उभे राहून कोरोनापासून आपल्याला दूर ठेवतच आहेत. पण जर एखाद्याला रक्ताची गरज भासली तर त्यांच्यासाठी पोलीस आता आपलं रक्त दान करत आहेत. 400 पेक्षा अधिक रक्ताच्या बॉटल केम रुग्णालयाला देण्यात आल्या. पूर परिस्थितीमध्ये सुद्धा 2008 बेचने अशीच मदत केली होती.
कुंडलिक आव्हाड यांचं 58 वेळा रक्तदान मुंबई पोलीस बॅचमध्ये 1996 झाली भरती झालेले कुंडलिक आव्हाड यांचं वय आता 49 वर्षे आहे. मात्र, त्याने आत्तापर्यंत 58 वेळा रक्तदान केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत त्यांना कधी सर्दी किंवा खोकल्याचा देखील त्रास झालेला नाही. पूर परिस्थिती असो मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असो किंवा आता कोरोनाचा प्रादुर्भाव असो दरवेळेला आव्हाड यांनी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलेलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस पोलिसांसाठी एक वाक्य म्हटलं जातं की ऑन ड्युटी चोवीस तास. आज या वाक्याला 2008 साली भरती झालेल्या या बॅचने शब्दशः खर करून दाखवले आहे.
Corona Police Death | डिस्चार्ज देताना टेस्ट न करण्याचा निर्णय कितपत योग्य? पोलीस कॉन्स्टेबल दीपक हाटेंच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न समोर