(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत गरज भासल्यास खासगी रुग्णावाहिका ताब्यात घेणार; पालिकेची हायकोर्टात भूमिका
मुंबईतील 3 हजारपैकी 100 तर राज्य सरकारच्या 97 रूग्णवाहिका केवळ कोरोनाबाधितांसाठी.आरटीओच्या वेबससाईटवर खासगी रूग्णवाहिकांची विभागवार माहिती जाहीर करणार, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती.
मुंबई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या संकटकाळात रुग्णवाहिकांची कमकरता भासल्यास खासगी रुग्णवाहिकाही ताब्यात घेण्याच्या विचारात असल्याची माहिती राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. मुंबई शहरात खासगी आणि सरकारी मिळून एकूण 3 हजार रुग्णवाहिका असून यातील 100 रुग्णवाहिका सध्या पालिकेनं केवळ कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. तर राज्य सरकारकडून 93 रुग्णवाहिका सुरू आहेत अशी माहिती हायकोर्टात देण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात खासगी वाहनांवर बंदी घालण्यात आल्यानं रूग्णांना रुग्ण्लयांमध्ये पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. रुग्णवाहिकेच्या या अपुऱ्या संख्येकडे सरकार दुर्लक्ष करीत असून ही संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. काही खासगी रुग्णवाहिकांचा मनमानी कारभार समोर आला असून अनेक ठिकाणी वेळेत न येणे, परिस्थितीचा गैरफायदा घेत जादा पैसे आकारण्यासारखे प्रकार समोर येत असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे.
Corona Updates | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 80 हजारांवर; आज 1475 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई उच्च न्यायालयात याचिका या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा प्रादेशिक परिवहन मंडळ (आरटीओ)च्या संकेत स्थळावर खासगी रुग्णवाहिका चालकांचे नंबर प्रकाशित करण्याबाबतच्या सूचना शासनामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीनं राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि पालिका प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी हायकोर्टाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने ही सुनावणी 9 जून पर्यंत तहकूब केली.
BMC Commissioner Iqbal Chahal | मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची विशेष मुलाखत! EXCLUSIVE