एक्स्प्लोर
भाजपचा पहिला फॉर्म्युला, 115 जागांवर दावा!
मुंबई: मुंबई महापालिकेच्या युतीसाठी पहिल्या फॉर्म्युल्यात भाजपनं 115 जागांवर दावा केल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 115 तर शिवसेनेच्या वाट्याला 112 जागा येत आहेत. मात्र हा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य होतो की नाही हे संध्याकाळीच कळू शकणार आहे.
संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान युतीबाबत सेना-भाजपच्या नेत्यात बैठक होणार आहे. यावेळी हा फॉर्म्युला भाजपकडून शिवसेनेपुढे मांडला जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपचा फॉर्म्युला
भाजपकडून आज 115 जागांचा प्रस्ताव देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेच्या आधारावर आमदारांची संख्या पाहता मुंबई महापालिका निवडणुकीत 50:50 फॉर्म्युला असावा, असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे एकूण 227 जगांपैकी 115 जागेचा प्रस्ताव आज भाजपकडून येण्याची शक्यता आहे.
ज्या पक्षाचा आमदार त्या मतदारसंघात त्या पक्षाला जास्त जागा सोडण्याचं सूत्र भाजपकडून पुढे केलं जाणार आहे. हा फॉर्म्युला 60:40 किंवा 80:20 ठरू शकतो.
एका मतदारसंघात 6 ते 7 वॉर्ड पकडल्यास, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमदार असलेल्या पक्षाला 4 जागा मिळतील आणि 2 जागा आमदार नसलेल्या.
यानुसार,
शिवसेना - 14 आमदार × 4 = 56
भाजप - 15 आमदार × 4 = 60
शिवसेना + भाजप = 56 + 60 = 116
उरलेल्या जागा = 227 - 116 = 111
या उरलेल्या जागा पुन्हा 50:50 कराव्यात की विधानसभेत झालेल्या मतदानाच्या पॅटर्नवर ठरवाव्यात यावर आजच्या बैठकीत खल होईल. शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंनी खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि शिवसेना उपनेता रवींद्र मिर्लेकर यांची निवड केली आहे. तर ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना युतीच्या चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मंत्र्यांची असमाधानकारक कामगिरी आणि शिवसैनिकांमधली वाढती नाराजी पाहता उद्धव ठाकरेंनी ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून 'ग्राऊंड वर्क' करणाऱ्यांना संधी दिल्याचं म्हटलं जातं आहे. अनिल परब - अनिल परब यांच्यावर पश्चिम आणि पूर्व उपनगरातील वॉर्डची जबाबदारी आहे. वकील असल्याने उमेदवारी अर्ज भरून घेणं, निवडणुकीच्या आचारसंहितेची नियमावली आणि कायदेशीर बाबी तपासून उमेदवारी अर्ज बाद होऊ न देण्याची जबाबदारी परब यांच्यावर असेल. रवींद्र मिर्लेकर - मिर्लेकर यांच्यावर दक्षिण आणि मध्य मुंबईची जबाबदारी आहे. जुन्या फळीतील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून मिर्लेकर यांची ओळख आहे. मिर्लेकर माजी विधानपरिषद आमदार, नाशिक आणि जळगाव सांपर्कप्रमुखाची जबाबदारी पार पाडली आहे. गिरगावमध्ये राहणारे आणि दक्षिण मुंबईचा वॉर्डनिहाय मतदारांचा अभ्यास असलेल्या मिर्लेकर यांना शिवसेनाच्या प्रशासकीय कामचा चांगला अनुभव आहे. अनिल देसाई - युतीच्या चर्चेत वाटाघाटी करण्याचं आणि भाजप - शिवसेनेतील प्रमुख दुवा असण्याची जबाबदारी अनिल देसाईंवर आहे. शिवसेनेचा चिलखती किंवा व्यूहरचना आखणारा चेहरा म्हणून अनिल देसाई ओळखले जातात. अतिशय शांत, संयमी दिसणारा मात्र चाणाक्षनीतीने धोरण राबवणारा नेता. बँकेच्या नोकरीचा अनुभव असल्याने अंकगणितावर चांगली पकड. बार्गेनिंग आणि वाटाघाटीमध्ये तरबेज असल्याचं म्हटलं जातं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement