एक्स्प्लोर

मुंबईतील रस्त्यांवर 'तमाशा' होणार, मनसेची 'बेस्ट' संपात उडी

बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण मुंबईकरांचे हाल करण्याची इच्छा कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही. इतका अन्याय होऊनही कर्मचाऱ्यांनी कधी संप पुकारला नाही. आता मुंबईकरांनीही या कर्मचाऱ्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन देखील देशपांडे यांनी केले आहे.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे. मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबत बेस्ट कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र तोडगी निघालेला नाही. अशातच कर्मचारी संतप्त झाले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या संपात उडी घेतली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यांवर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन व सत्ताधारीच जबाबदार असतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण मुंबईकरांचे हाल करण्याची इच्छा कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही. इतका अन्याय होऊनही कर्मचाऱ्यांनी कधी संप पुकारला नाही. आता मुंबईकरांनीही या कर्मचाऱ्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन देखील  देशपांडे यांनी केले आहे. वडाळा डेपोत बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर देशपांडे म्हणाले की, संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत पण तुमच्या मनात मुंबईकरांचे हाल व्हावे अशी इच्छा नाही. इतका अन्याय होऊनही तुम्ही संप पुकारला नाही, आता मुंबईकरांनी बेस्टचा विचार करावा. आम्हाला मुंबईकरांना वेठीस धरायचे नाही, पण प्रशासन कामगारांना वेठीस धरणार असेल तर आमचा नाइलाज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाने आम्हाला वेठीस धरु नये, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आम्हाला घाबरवू नये, स्वत:च्या पायावर बाहेर पडायचे असेल तर आमच्या वाट्याला जाऊ नका, असा इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. बेस्ट कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी हा इशारा दिला.  सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यांवर तमाशाच होईल आणि यासाठी जबाबदारी प्रशासन व सत्ताधाऱ्यांची असेल, असे त्यांनी म्हटले आहे. फेसबुक पोस्टद्वारे शिवसेनेवर टीका देशपांडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईकरांचे आणखी दोन दिवस हाल, बेस्टचा संप लांबण्याची शक्यता बेस्टचा संप आता आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबत बेस्ट कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान महापालिका - बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना अशा दोन्ही बाजू उच्च स्तरीय समितीने ऐकून घेतल्या. उच्च स्तरीय समितीने कर्मचारी संघटनांकडून लेखी स्वरूपात मागण्या मागवून घेतल्या आहेत. मुख्य सचिव चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. त्यानंतर उच्च स्तरीय समिती अहवाल सोमवारी कोर्टासमोर सादर करणार आहे. या कोर्टात मांडलेल्या अहवालावर कोर्ट काय निर्णय देईल यावर बेस्ट संपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.. बेस्ट कर्मचारी संपाचा पाचवा दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज पाचव्या दिवशीही सुरुच आहे. संपाबाबत काल झालेल्या बैठकांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं संप सुरुच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कामगार कृती समितानं घेतला. मात्र मुंबईरांचे हाल होऊ नये यासाठी स्कूल बस संघटना आणि मुंबई बस मालक संघटना धावून आली आहे. जवळपास दोन हजार खासगी बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी आज रस्त्यावर धावणार आहेत. बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड गैरसोईला सामोरं जावं लागत आहे. मुंबईकरांचा त्रास कमी व्हावा यासाठी स्कूल बस संघटना आणि मुंबई बस मालक संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही संघटना मुंबईकरांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी जवळपास दोन हजार बसेस रस्त्यावर उतरवणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या - बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे - 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी - एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे - 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस - कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा - अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी

संबंधित बातम्या

संपाचा मुंबईकरांना फटका, बेस्ट भाडेवाढीचा प्रस्ताव

बेस्ट कर्मचारी संपावर चौथ्या दिवशीही तोडगा नाहीच

बेस्ट प्रशासनाचं कुठे अडलंय?

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी

बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी

बेस्टचा संप : तिसऱ्या दिवशीही बस रस्त्यावर नाही, बत्तीही गुल होणार?

बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात

दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget