एक्स्प्लोर
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर आज मुलुंड ते माटूंगा दरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज (रविवार)25 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामासाठी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा एकदा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर आज मुलुंड ते माटूंगा दरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणवरून सीएसएमटीकडे जलद मार्गाने धावणाऱ्या सर्व लोकल दिवा आणि परळ या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील. सीएसएमटीवरून सुटणारी डाऊन जलद, सेमी जलद लोकल नियमित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या लोकल बोरीवली आणि गोरगाव येथून जलद मार्गावरून धावणार आहेत. तसेच बोरीवली स्थानकादरम्यान काही तांत्रिक कामासाठी फलाट क्रमांक 1,2,3,4 वरुन एकही लोकल धावणार नाही.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेच्या पनवेल ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर नेरुळ ते खारकोपर या स्थानकादरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पनवेल-अंधेरी लोकलसेवाही बंद राहणार आहेत. मात्र ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ येथील लोकल वेळापत्रकानुसारच धावणार आहेत. तर ठाणे ते पनवेल लोकल बंद राहणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement