एक्स्प्लोर
Advertisement
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मेगाब्लॉक काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धिम्या आणि जलद लोकल फेऱ्यांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहे. या बाबतची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज (रविवार) 21 ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक बाबींची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा एकदा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात डाऊन जलद मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येतील. दरम्यान ठाणे ते कल्याणमधील रेल्वे वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.
मेगाब्लॉक काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धिम्या आणि जलद लोकल फेऱ्यांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहे. या बाबतची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
पश्चिम रेल्वे
पश्चिम मार्गावर बोरीवली ते अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 2.35 पर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात रेल्वे वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावरुन वळवण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक काळात या मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांसाठी सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ मार्गावर विशेष फेºया चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक काळात पनवेल ते वाशी ही सेवा पूर्णपणे बंद असेल. पण सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरुळ या दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement