एक्स्प्लोर
डोंबिवलीत 19 वर्षीय तरुणाला जैन धर्माची दीक्षा
डोंबिवलीतला 19 वर्षांच्या मंदार म्हात्रे आज जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. त्यासाठी आज पहाटे साडेचारपासून डोंबिवलीच्या पांडुरंगवाडी जैन मंदिरासमोर मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
डोंबिवली : डोंबिवलीतला 19 वर्षांच्या मंदार म्हात्रे आज जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. त्यासाठी आज पहाटे साडेचारपासून डोंबिवलीच्या पांडुरंगवाडी जैन मंदिरासमोर मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तिथं जैन मुनींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. दीक्षा विधी पूर्ण झाल्यानंतर मंदारचं नाव बदलून मुनिराज मार्गशेखर विजयजी असं ठेवण्यात आलं आहे.
यापुढे मंदार जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. मंदारचं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आहे. त्यानंतर त्यानं जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हात्रे कुटुंबीयांच्या शेजारी गुजराती जैन कुटुंब राहतं. लहानपणापासून मंदार या कुटुंबीयांसोबत जैन मंदिरात जात होता. तिथं एका बालमुनीशी त्याची भेट झाली आणि आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याचं मंदारचं म्हणणं आहे. महत्वाची बाब म्हणजे एकुलत्या एक मुलाच्या या निर्णयानंतर आपण समाधानी असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.
मंदार आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, सगळं लहानपण मराठमोळ्या डोंबिवलीत गेलेलं. पण आता त्याने जैन धर्म स्वीकारला आहे. यानंतर आयुष्यभर तो जैन मुनी म्हणून जैन धर्माचा प्रचार करणार आहे.
जैन धर्माची दीक्षा घेतल्यानंतर मंदारचं आयुष्य पुरतं बदलून जाणार आहे. अंगात पांढरे कपडे, जैन मंदिरात वास्तव्य, अनवाणी फिरणं. सुखवस्तू आयुष्याचा त्याग करणं, दोन वेळा जेवणं तर दूर, पण अगदी पंख्याची हवा किंवा फ्रिजचं पाणीही न पिणं असे जैन मुनींच्या आयुष्यात असलेले निर्बंध मंदारला पाळावे लागणार आहेत. त्यानंतर तो आयुष्यभर कधीही त्याच्या घरीही जाऊ शकणार नाही. अगदी सुखाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगीसुद्धा...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement