एक्स्प्लोर
Advertisement
अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री : संजय राऊत
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर आता संजय राऊत यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.
मुंबई : एसीबीकडून क्लीन चिट मिळालेल्या अजित पवारांसंदर्भात संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लीन चीट मिळाल्याचा आनंदच आहे, ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत अशा अनुषंगाचं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. येत्या 24 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ होणार आहे. शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 11 तर काँग्रेसचे 8 मंत्री शपथ घेणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर आता संजय राऊत यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.
अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे', असं म्हटलं होतं. अजित पवार यांचे बंड पूर्वनियोजित होते का? अशी विचारणा केली असता अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या आहेत, असं राऊत यांनी याआधी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. हे शरद पवारांनी ठरवले होते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले होते की, `मी मागेही म्हणालो होतो की शरद पवारांना समजावून घ्यायला भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील. 'दिग्दर्शक कोण होते? असे विचारले असता ते म्हणाले, `ते जॉइंट व्हेन्चर होते. ते होते, आम्ही होतो, सगळेच होते.'दिग्दर्शक - स्क्रिप्ट कोणाचे होते? असे विचारले असता `हे लवकरच कळेल.', असं उत्तर राऊत यांनी दिलं होतं.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, हे वाक्य घेऊन संजय राऊत यांनी निवडणुकांनतर रान पेटवले. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामागे संजय राऊत यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा - सर्व ठरल्याप्रमाणे झालेय, 'ते' जॉइंट व्हेन्चर, दिग्दर्शक कोण हे लवकरच कळेल : संजय राऊत
दुसरीकडे अशी माहिती आहे की, येत्या 24 तारखेला मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री शपथ घेणार आहे. राष्ट्रवादीचे 8 कॅबीनेट आणि 3 राज्यमंत्री तर काँग्रेसचे 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने तात्पुरते खातेवाटप जाहीर केले होते.
हेही वाचा - सत्तेची वाट पाहणाऱ्या संजय राऊतांना वेड लागलं, त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा- रावसाहेब दानवे
VIDEO | काय म्हणाले संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement