एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या तरुणाला उठाबशा काढायला लावल्या, व्हिडीओ व्हायरल
मनसैनिकांनी रोहितला जाहीर माफी मागायला लावली तसेच त्याला 50 उठाबशा काढायला लावल्या. यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला.
पुणे : पुण्यातील एका तरुणाला सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणे चांगलेच महागात पडले आहे. राज ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी तरुणाला उठाबशा काढायला लावल्या आहेत.
पुण्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. मनसैनिकांनी त्याचा शोध घेतला असता तो पुण्यात राहत असल्याचे उघड झाले. पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांच्यासह मनविसेचे शहर अध्यक्ष विकी अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी त्या तरुणाच्या घरी पोहोचली.
यावेळी मनसैनिकांनी रोहितला जाहीर माफी मागायला लावली तसेच त्याला 50 उठाबशा काढायला लावल्या. यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनसैनिक चिडले होते, पण त्या तरुणाच्या घरी गेल्यावर त्याची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. त्याचे घर भाड्याचे आहे, तर वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याला मारहाण न करता उठाबशा काढायला लावल्या, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ
राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी उठाबशा काढायला लावल्या. pic.twitter.com/MbaIYg9Jup
— ABP माझा (@abpmajhatv) January 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
लातूर
मुंबई
Advertisement