एक्स्प्लोर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी जाणार?
तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
नागपूर : ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणार आहेत. संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे, संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकार देखील केला आहे.
तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.
मात्र, मुखर्जींच्या ही उपस्थिती काँग्रेसला मानवणार का? मुखर्जींनीही हा कार्यक्रम आजच्या परिस्थितीत का घेतला? या प्रश्नांनी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचं वातावरण गरम केलं आहे.
बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement