एक्स्प्लोर
Advertisement
कोण करणार 'काटा' किर्र, नागपुरात आमदारांची वजनचाचणी
नागपूर : नेते आणि आमदार मंडळींचं सामाजिक वजन या ना त्या कारणाने आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आमदार मंडळी प्रत्यक्षात किती 'वजनदार' आहेत, हे बुधवारी पाहायला मिळणार आहे.
कुठल्या आमदाराचं वजन किती याची नागपुरात चाचणी केली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात जमलेल्या आमदारांची उद्या सकाळी विधानभवनात आरोग्य तपासणी केली जाईल.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे फिटनेस फ्रीक असल्यामुळे त्यांनी या शिबीराचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात येईल. एकीकडे फडणवीसांनी वजन कमी केलं असलं, तरी त्यांचं राजकीय वजन वाढलेलं आहे.
या तपासणीत बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) चेक करुन आमदारांना सल्लाही दिला जाणार आहे. त्यामुळे कोणते मंत्री महोदय वजनाचा 'काटा' किर्र करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
Advertisement