एक्स्प्लोर
अॅम्ब्युलन्सवर फोटो पालकमंत्र्यांचा, वाहतूक विदेशी दारुची !
नाशिक : नाशिकमध्ये संशयास्पदरित्या सायरन वाजवत जाणाऱ्या अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बायपासजवळ पहाटे 2 वाजता ही घटना घडली. यातून 26 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आले आहेत.
या अॅम्ब्युलन्सवर सर्वच राजकीय नेत्यांचे फोटो होते.
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, जयकुमार रावल यांच्यासोबत शिवेसना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांचे फोटो अॅम्ब्युलन्सवर आहेत.
याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement