Vikram Gokhale : 2014 पासूनच खरं स्वातंत्र्य मिळालं यावर ठाम, ते बदलणार नाही : विक्रम गोखले
स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) ठाम आहेत. खरं स्वातंत्र्य 2014 पासूनच मिळालं यावर ठाम असून ते बदलणार नाही अशी प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी दिली.
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यानंतर विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले. परंतु स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले ठाम आहेत. खरं स्वातंत्र्य 2014 पासूनच मिळालं यावर ठाम असून ते बदलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कंगनाला समर्थन दिल्यामागे स्वतःची काही कारणं होती असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. माझी कंगनाशी ओळख नसली, तरी राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं आहेत. ती आता सांगत बसत नाही, असे देखील गोखले म्हणाले. पुण्यातल्या भाषणाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
विक्रम गोखले म्हणाले, भाजप आणि शिवसेनेने एकत्र आले पाहिजे. लहान आणि मोठ्या भावात वितुष्ट निर्माण झाले. दोन्ही पक्ष देशासाठी काम करत आहे. जनतेने दोन्ही पक्षांना मत दिले परंतु जनतेशी धोका झाला. 25 वर्षाची मैत्री तुटली. दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे माझे मत आहे. राजकीय पक्षांनी पण मला आमच्यात या अशी ऑफर दिली होती. तसेच तुम्हाला काय हवं ते देतो असं सांगितलं होतं पण मी गेलो नाही. राजकीय पक्षांनी पण मला आमच्यात या अशी ऑफर दिली होती. तसेच तुम्हाला काय हवं ते देतो असं सांगितलं होतं पण मी गेलो नाही.मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हतो आणि नसेन. शिवसेना आणि भाजपने मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. शिवसेना, भाजपची युती तुटणं ही चूकच आहे.
संबंधित बातम्या :
स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली, विक्रम गोखलेंकडून समर्थन
महागाई काय मोदींनी वाढवली; विक्रम गोखले यांचा उलट प्रश्न
स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली, विक्रम गोखलेंकडून समर्थन
Farm Law Repeal : ...तर आपण जिहादी देश आहोत, कंगना रनौतनं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान