एक्स्प्लोर
पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे
उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी पुणे ते सातारा हा प्रवास एकाच गाडीतून केला. या प्रवासादरम्यान काय काय गप्पा झाल्या, याबाबतची माहिती स्वत: उदयनराजेंनी दिली.
![पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे Udayanraje Bhosales Journey With Sharad Pawar पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/04103607/Sharad-Pawar-Udayanraje-Bhosale.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केल्याने, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी पुणे ते सातारा हा प्रवास एकाच गाडीतून केला. महत्त्वाचं म्हणजे ही गाडी शरद पवारांची होती आणि त्या गाडीचं ड्रायव्हिंग स्वत: उदयनराजे करत होते.
या प्रवासादरम्यान काय काय गप्पा झाल्या, याबाबतची माहिती स्वत: उदयनराजेंनी पत्रकारांना दिली. साताऱ्यात पोहोचल्यानंतर, उदयनराजेंनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
पवार साहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता
यावेळी उदयनराजेंनी गाडीतील गप्पांबाबतची माहिती दिली. उदयनराजे म्हणाले, “आमची पवारसाहेबांच्या गाडीबद्दल चर्चा सुरु होती. पवार साहेबांची पूर्वीची लँड क्रूझर गाडी भारी होती. सध्याची गाडी तितकीशी कम्फर्टेबल नाही. मात्र त्यांच्या गाडीचा नंबर तोच आहे, तीन तिऱ्ऱ्या, अर्थात 333, आणि आपल्या गाडीचा सत्ता ( 7) दोन्हीही भारी आहे. मी त्यांना विचारलं तीन तिऱ्ऱ्या का, पण ते म्हणाले, कायम माहित नाही”
आपण आपल्या स्टाईलमध्ये जगतो
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांकडे तक्रारी केल्याचं सांगण्यात येतं, त्याबाबत विचारलं असता उदयनराजे म्हणाले, “कोणी कुणाची तक्रार केली हे आपल्याला माहित नाही. ज्यांनी केली असेल त्यांना विचारा, पवारसाहेबांनी मला विचारलं असतं, तर मी सांगितलं असतं. आपण स्टाईलमध्ये जगतो, आपण इंटरनॅशनल लेव्हलची माणसं आहोत, हायटेक गोष्टी करतो, याने तक्रार केली, त्याने तक्रार केली, याकडे लक्ष देत नाही”
भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे
दरम्यान उदयनराजेंनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, याचा अर्थ कोणी पण उत्पात केला तर मी सहन करुन घेणार असं नाही. गप्प आहे, तोवर ग्प्प आहे, असं उदयनराजे म्हणाले.
नारायण राणेंबाबत
यावेळी उदयनराजेंना नारायण राणेंचा नवा पक्ष, तसंच त्यांना भाजपमध्ये येण्यास कोणी रोखलं, याबाबत विचारण्यात आलं. उदयनराजे म्हणाले, “कुणी कोणाला थांबवलं मला माहित नाही, मी कुणाला थांबवत नाही, मी फक्त मलाच थांबवू शकतो, कारण माझ्या गाडीचे ब्रेक माझ्या हातात आहेत, मी माझीच गाडी थांबवू शकतो, दुसऱ्याची नाही, कारण दुसऱ्याचे ब्रेक माझ्या हातात नाही”
संबंधित बातमी
पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग उदयनराजेंच्या हातात
![पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/04160259/Udayanraje-Bhosale-1-580x395.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)