एक्स्प्लोर
उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्त विद्यापीठ आहेत : मुख्यमंत्री
‘पवार साहेब, आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून राजे खासदार म्हणून निवडून आले असले तरी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, ते एक मुक्त विद्यापीठ आहेत.’
![उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्त विद्यापीठ आहेत : मुख्यमंत्री Udayan Raje is a open university said Chief Minister उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्त विद्यापीठ आहेत : मुख्यमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/24202235/udayanraje-n-cm.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : ‘पवार साहेब, आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून राजे खासदार म्हणून निवडून आले असले तरी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, ते एक मुक्त विद्यापीठ आहेत.’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंच्या 51 व्या वाढदिवस सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
उदयनराजे म्हणजे मुक्त विद्यापीठ : मुख्यमंत्री
'खरं म्हणजे आजचा मंच जर आपण पाहिला तर आजच्या या मंचाला कोणत्याही पक्ष अथवा समाजाचं बंधन नाही, याचं कारण असं की, छत्रपती उदयनराजे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचं कौतुक केलं. ‘पवार साहेब, आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून ते खासदार म्हणून निवडून आले असले तरी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, छत्रपती उदयनराजे हे एक मुक्त विद्यापीठ आहेत. या विद्यापीठाचे नियम ते स्वत: तयार करतात आणि त्या नियमाची अंमलबजावणीही तेच करतात, त्यांच्या नियमाचं पालन जे करत नाहीत त्यांना शासनही तेच करतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने तमाम जनता त्यांच्यावर आज प्रेम करते.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ‘महाराजांना गेल्या अनेक वर्षापासून मी जवळून पाहतो आहे. त्यांनी या जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. महाराज मला महिन्याभरातून एकदा तरी भेटतात. पण ते जेव्हा येतात तेव्हा त्यांची स्वत:करिता कोणतीही मागणी नसते. ते मागणी घेऊन येतात ते या जिल्ह्याची, सातारा शहराची आणि येथील रयतेची.' असं म्हणत त्यांनी उदयनराजेंच्या कामाचंही कौतुक केलं.दरम्यान, उदयनराजे भोसलेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत विशेष सोहळ्याचं आयोजन केलं. याचवेळी अनेक विकासकामांचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठे नेते या सोहळ्याला उपस्थित होते. मोदी लाटेतही उदयनराजे मोठ्या मताधिक्क्यानं निवडून आले. मात्र, तरीही साताऱ्यात राष्ट्रवादीचा एक गट उदयनराजेंच्या विरोधात आहे. त्यामुळे या शक्तीप्रदर्शनाच्या निमित्तानं उदयनराजे आपल्या पक्षाला काही मेसेज देऊ इच्छितात का?, अशीही चर्चा आता साताऱ्यात रंगू लागली आहे. VIDEO : संबंधित बातम्या : खा. उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)