एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
समाजामुळे तुम्ही, तुमच्यामुळे समाज नाही, उदयनराजेंचा पवारांना इशारा
![समाजामुळे तुम्ही, तुमच्यामुळे समाज नाही, उदयनराजेंचा पवारांना इशारा Udayan Raje Bhosale Taunts Sharad Pawar समाजामुळे तुम्ही, तुमच्यामुळे समाज नाही, उदयनराजेंचा पवारांना इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/07202655/udayanraje-pawar-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना घरचा आहेर दिला आहे. तुमच्यामुळे समाज नाही, समाजामुळे तुम्ही आहात हे लक्षात ठेवा, असं म्हणत भोसलेंनी निशाणा साधला आहे.
तुमच्यामुळे समाज नाही, समाजामुळे तुम्ही आहात, समाज कधी पायाखाली घेईल सांगता येत नाही, असा इशारा उदयनराजे यांनी पवारांना दिला आहे. अॅट्रोसिटीच्या मुद्द्यावरुन भोसलेंचं पवारांशी दुमत होतं.
अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करावा, खासदार उदयनराजे आक्रमक
अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे, असं म्हणतानाच अॅट्रोसिटीच्या 90 टक्के केसेस बोगस असतात, असा दावाही उदयनराजेंनी केला आहे. कोण काय म्हणालं याच्याशी मला देणंघेणं नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी शरद पवारांना लगावला. पवारांनी अॅट्रोसिटी कायद्यात बदल करण्याचं सुचवलं होतं, त्याबाबत प्रश्न विचारला असता, उदयनराजेंनी उत्तर दिलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही उदयनराजे भोसलेंनी केली. 11 तारखेला साताऱ्यात होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चात उदयनराजे भोसले सहभागी होणार आहेत.सवर्णांकडून दलितांचा वापर करुन अॅट्रॉसिटीचा गैरवापर : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)