एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उडानच्या माध्यमातून नांदेड-हैदराबाद विमानसेवा उद्यापासून सुरु
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या गुरुवारी उडान योजनेचा शुभारंभ होणार आहे. या योजनेअंतर्गत उद्यापासून नांदेड हैदराबाद विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. उडानच्या माध्यमातून माफक दरांमध्ये विविध राज्यांतील शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड-हैदराबाद, कडप्पा-हैदराबाद आणि शिमला-दिल्ली मार्गावर उद्यापासून ही विमानसेवा सुरु करण्यात येईल.
पंतप्रधान मोदी उद्या गुरुवारी शिमल्यातून या योजनेचं लोकार्पण करणार आहेत. पीएमओनं यासंबंधी ट्विट करुन उडान ही योजना देशातील सामान्य नागरिकाचा अधिकार आहे. प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी मोठ्या पातळीवर सुरु करण्यात आलेली ही पहिलीच योजना असल्याचं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.
देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी क्षेत्रीय संपर्क योजना ऑक्टोबर 2016 मध्येच सुरु करण्यात आली होती. मात्र उद्या गुरुवारी या योजनेचं लोकार्पण होणार आहे. जवळपास 500 किमीसाठी एक फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट असेल, ज्याच्या माध्यमातून 1 तासाच्या प्रवासासाठी किंवा हेलिकॉप्टरने अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी भाडं फक्त 2500 रुपये असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement