(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्तीसगडच्या दोन तरूणींची अकोल्यात आत्महत्या, रेल्वेतून उडी मारून संपवलं जीवन
दोघीही मुली या छत्तीसगडमधील जांगीर जिल्ह्यातील चापा गावातील असून त्यांनी घरचे रागवतात या क्षुल्लक कारणावरुन हे पाऊल उचललं आहे.
अकोला : छत्तीसगडमधील दोन 19 वर्षीय युवतींनी अकोल्यात रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीआहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातल्या मनारखेड रेल्वे क्रॉसिंगवर काल हा सर्व प्रकार समोर आला आहे. या दोघींनीही मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली आहे. बेबी राजपूत आणि पुजा गिरी अशी मृत मुलींची नावं आहेत. दोघीही आयटीआयचं शिक्षण घेत होत्या. दोघीही छत्तीसगडमधील जांगिर जिल्ह्यातील चापा गावच्या रहिवाशी होत्या. घरचे रागावतात म्हणून दोघीही घरून पळून आल्याचं समोर येत आहे. दरम्यान, या दोघींचेही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अकोल्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास अकोल्यातील उरळ पोलीस करीत आहेत.
नेमकं काय घडलं?
आयटीआयचं शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींनी अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनारखेड रेल्वे चौकी परिसरात ही घटना घडली आहे. गुरूवारच्या सकाळी या दोन्ही मुलींनी मुंबई-कलकत्ता रेल्वेमधून पाठोपाठ उडी घेत, आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे या दोघीचं हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. या दोघीही सख्ख्या मावस बहिणी असल्याचं देखील समोर आलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात 19 वर्षीय दोन मुलींचे मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आले. ही घटना बुधवारनंतरच्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच गुरूवारच्या पहाटे घडली. ज्यानंतर काल सकाळी ही माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शव-विच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान, दोन्ही तरुणींची ओळख समोर आली आहे. बेबी राजपुत (वय 19, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) आणि पूजा गिरी, (वय 19, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) असं या मृतक तरुणींचे नावे आहे. या दोघीही गेल्या चार दिवसांपूर्वी कॉलेजला जाते, असे सांगून घरून निघून गेल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. त्यांचा शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. अखेर, त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठले आणि बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. दरम्यान, या दोन्ही तरुणींनी मुंबई-कोलकाता रेल्वेमध्ये प्रवासात आपली जीवनयात्रा संपवली. यावेळी दोन्ही मुलींच्या अंगात आयटीआयचा गणवेश देखील होता, असे असले तरी प्रकरण नेमके काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर करीत आहेत.
दोघींनीही एकामागे एक घेतली उडी
रेल्वेमध्ये उपस्थित प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-कोलकाता रेल्वेमध्ये पूजा आणि बेबी हे प्रवास करत असताना, या दोघींनी मनारखेडनजीक रेल्वेतून पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी एकामागे एक उडी घेतली. यावेळी दोन्ही मुली आयटीआयच्या गणवेशात होत्या. त्यांचं आयटीआयमध्ये शिक्षण सुरु होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपाची ऑनलाइन परीक्षा दिली. दरम्यांन, या दोन्ही मुलींच्या आत्महत्या नेमकं कारण अद्याप पर्यत कळू शकले नाही. मात्र, या घटनेला कौटुंबिक कलहाची किनार असल्याचे समजते.
हे ही वाचा-
- सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न महाग! मालेगावमध्ये राज्यात सर्वाधिक रेडिरेकनरचे दर
- SSC Exam : गोंदिया जिल्ह्यातील शाळेत 10 वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार; पालकाने काढला व्हिडिओ
- सोशल मीडियावर सरकारविरोधी मत व्यक्त केल्यानं प्राध्यापकाचं थेट निलंबन! FTII संचालकांच्या चौकशीचे हायकोर्टाकडून आदेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha