एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या दोन नगरसेवकांना अटक
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक केली.
औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी औरंगाबादमध्ये एमआयएमच्या दोन नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक केली.
एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं.
महापालिकेच्या 16 ऑक्टोबर 2017 रोजीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक 60 चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊन हॉल वॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घातला होता.
महापौरांचा राजदंड सभागृहाबाहेर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अधिकारी बापू जाधव यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या दोघा नगरसेवकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि खुर्ची फेकून मारली होती.
संबंधित बातमी :
औरंगाबाद मनपात एमआयएम नगरसेवकांची राडेबाजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement