एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जुळ्यांची अनोखी जन्मकथा, एकाचा लोकलमध्ये दुसऱ्याचा स्टेशनवर जन्म
स्टेशन मास्तरांपासून ते लोहमार्ग पोलीस,स्थानक सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जण कामाला लागले. रेल्वे स्थाकावर पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे सफाई कर्मचारी यांनी प्रसूतीची गरज लक्षात घेता संपूर्ण प्रतिक्षालय स्वच्छ केले तर पोलिसांनी यात आपली चोख भूमिका बजावली. रेल्वे प्रवाशांची मदतही यावेळी महत्वाची ठरली.
पालघर : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सफाळे देऊळपाडा येथील रहिवासी छाया सवरा या वीस वर्षीय महिलेने विरार-डहाणू लोकलमध्ये एका बाळाला जन्म दिला. तर पालघर रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. आश्चर्याची बाब म्हणजे पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चक्क रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षालयात त्यांनी ही प्रसूती केली.
दोन्ही बाळं व माता यांची प्रकृती आता चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. छाया यांना सकाळच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना जाणवल्याने तिच्या पतीने तिला सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र प्रसूतीमध्ये अडचणी येणार असल्याने तिला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास तेथील डॉक्टरांनी सांगितले. वेळ कमी असल्यामुळे तिचा पती अंकुश व सासू कमली यांनी तिला रेल्वेने नेण्याचा निर्णय घेतला.
सकाळीच नऊच्या सुमारास विरार-डहाणू लोकलमध्ये छाया हिला बसवून पालघर येथे नेत असताना पालघर स्थानकानजीक तिच्या प्रसूतीच्या कळा वाढल्या त्यातच लोकलमध्ये तिने यातील एका बाळाला जन्म दिला. या घटनेची माहिती पालघर रेल्वे स्थानकाच्या कार्यालयास देण्यात आली. त्यानुसार स्टेशन मास्तरांपासून ते लोहमार्ग पोलीस,स्थानक सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जण कामाला लागले. रेल्वे स्थाकावर पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे सफाई कर्मचारी यांनी प्रसूतीची गरज लक्षात घेता संपूर्ण प्रतीक्षालय स्वच्छ केले तर पोलिसांनी यात आपली चोख भूमिका बजावली. रेल्वे प्रवाशांची मदतही यावेळी महत्वाची ठरली.
लोकल पालघर स्थानकात सुमारे 20 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. छाया यांना त्यानंतर प्रतीक्षालयात पुढील प्रसूतीसाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरांच्या चमूच्या प्रयत्नातून या मातेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. या प्रसूतीनंतर बाळ व माता सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. माता व बाळांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पाठविण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement