टीआरपी घोटाळा प्रकरण, मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीच्या तीन अधिकाऱ्यांची चौकशी
टीआरपी घोटाळा प्रकरणी आज पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी यांची 9 तास, COO हर्ष भंडारी यांची 6 तास, तर मुंबईत आणि दमण पोलिसांनी डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग याची 6 तास कसून चौकशी केली आहे.
मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणी आज दिवसभर मुंबई क्राईम ब्रान्चने रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी, हर्ष भंडारी यांची मुंबईत तर दमणमध्ये डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग यांची पोलिसांनी चौकशी केली. या तिघांनाही उद्या चौकशीसाठी कागदपत्रांसह पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. CRPC 91 अंतर्गत नोटीस बजावली असून चॅनलला मिळालेल्या जाहिराती, त्यातून मिळालेले उत्पन्न आणि इतर महत्त्वाची कागदपत्र घेऊन चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
टीआरपी घोटाळा प्रकरणी आज पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी यांची 9 तास, COO हर्ष भंडारी यांची 6 तास, तर मुंबईत आणि दमण पोलिसांनी डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग याची 6 तास कसून चौकशी केली आहे. या तिघांनाही टीव्ही जाहिराती संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर पोलिसांकडे जमा करण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न, नफा, तोटा यांसंदर्भातला सगळा डाटा रिपब्लिकला पोलिसकडे द्यावा लागणार आहे.
आजच्या चौकशीत टीव्हीवर दिसणाऱ्या कंटेंटशी आमचे देणंघेणं नसून त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, अशी माहिती विकास खानचंदानी यांनी दिली आहे. काल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यामध्ये हंसा नावाच्या कंपनीचा अहवाल आहे. असं सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडेवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र हंसा कंपनीने तो अहवाल स्वतःचा नसल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे. या संदर्भात वेगळी चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. आज या शो संदर्भात उत्तर देण्यास विकास खानचंदानी यांनी असमर्थता दर्शवली आहे.
मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त; रिपब्लिक टीव्हीची चौकशी सुरू
काल सीएफओ एस सुंदरम आणि डिस्ट्रिब्युटर हेड यांना समन्स बजवण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवले होतं. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टातली सुनावणी होईपर्यंत आमची चौकशी थांबवावी असं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एक समन्स जारी केलं त्यावर आईच्या कोविड आजाराचे कारण सुंदरम यांनी पोलिसांना सांगितलं आहे. 14 ऑक्टोबरनंतर चौकशीला हजर राहू असं एस सुब्रमण्यम (सीएफओ) यांनी स्पष्ट केले आहे. तर प्रिया मुखर्जीने बंगलोरमध्ये असल्याने येऊ शकत नसल्याचे आज सकाळी पोलिसांना कळवले. शिवाय सुप्रीम कोर्टातली सुनावणी होईपर्यंत चौकशीला येणार नसल्याचे मुखर्जीचे पोलिसांना उत्तर दिले आहे.
TRP घोटाळा : मुंबई क्राईम ब्रांच सहा जणांची चौकशी करणार; रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश
आज गुन्हे शाखेची पोलिसांची एक टीम या प्रकरणातल्या आरोपींच्या शोधासाठी राजस्थानला रवाना झालेली आहे. विशाल भंडारी याच्या घरातून आज गुन्हे शाखेने एक डायरी हस्तगत केली आहे. ज्यामध्ये बॅरोमिटर आणि चॅनेल्सची नाव आणि ट्रान्जेक्शनच्या नोंदी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आलेल्या तीन चॅनेल्सपेक्षा जास्त चॅनल्सची नाव आहे. त्यानुसार लोकांना पैसे द्यायचे आहेत, अशी नोंद आरोपी विशालने त्याच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली आहेत. विशालने त्याच्या डायरीमध्ये 1800 घरांचे डिटेल्स ठेवले आहेत. ज्यामध्ये बॅरोमीटर्स बसवण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेल्सच्या व्यतिरिक्त आणखी काही चॅनेल्स संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे. याच बरोबर रिपब्लिककडून एका बँक खात्याची माहिती मिळालीय त्याचे डिटेल्स पोलीस घेत आहेत.