एक्स्प्लोर
Advertisement
शैक्षणिक सुविधांच्या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन
नाशिकः शैक्षणिक सुविधांच्या मागण्यांसाठी नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवन दणाणून सोडलं. आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भवनाच्या प्रवेश द्वारावर टाळं ठोकत जोरदार घोषणाबाजी केली.
शैक्षणिक वर्ष सुरु होऊन महिना उलटला तरी आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेले नाहीत. ज्या ठिकाणी प्रवेश दिले तिथे शैक्षणिक साहित्य, चांगल्या जेवणाची वाणवा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना जवळपास दोन वर्षांपासून गणवेश मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा तरी विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे प्रशासन कधी लक्ष देणार, ते पाहणं महत्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement