एक्स्प्लोर
पुणे सातारा रस्त्यावर भीषण अपघात, तीन तरुणांचा मृत्यू तर पाच तरुण जखमी
या अपघातील सगळे तरुण पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात राहणारे आहेत. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे : पुणे सातारा रस्त्यावर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. कोंढणपुरजवळ ट्रक आणि तीन दुचाकींच्या धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात पुण्यातील तीन तरुणांचा मृत्यू झालायं तर पाच तरुण जखमी झाले आहेत. या अपघातील सगळे तरुण पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात राहणारे आहेत. सोमवारी रात्री पार्टी केल्यानंतर हे तरुण रात्री डे बारा वाजता कोंढणपुर जवळ असलेल्या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी निघाले. मात्र कोंढणपुरजवळ या तीनही दुचाकी ट्रकला धडकल्या. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Car Accident | दारुडा यमदूत, दारुच्या नशेत कारचालकाने अनेकांना उडवलं | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha अपघातातील मृतांची संख्या अनिकेत रणदिवे सुशील कांबळे सुरेश शिंदे जखमी - करण जाधव राकेश कुर्हाडे अमर कांबळे चेतन लोखंडे
आणखी वाचा























