एक्स्प्लोर
पारनेर बलात्कार आणि हत्या प्रकरण, तीन जण दोषी
या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने 2014 सालच्या या प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
अहमदनगरला पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या तिघांवरही बलात्कार आणि हत्येसह सहा आरोप ठेवण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
22 ऑगस्ट 2014 साली लोणी मावळा गावात मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली होती. पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यावर घरी येताना अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. आरोपींना दोषी ठरवल्यानंतर अण्णा हजारे यांनी फोनवरुन निकम यांचं अभिनंदन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement