एक्स्प्लोर
रेल्वेच्या धडकेत अस्वलीचा 2 पिल्लांसह मृत्यू
चंद्रपूर : चंद्रपुरात मादी अस्वलीचा दोन पिल्लांसह रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. केळझर जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर ही दुर्घटना घडली.
आज सकाळी गोंदियावरुन बल्लारपूरकडे जाणाऱ्या बीएनआर पॅसेंजरने 10 वाजण्याच्या सुमारास ही धडक दिली. ज्यामध्ये या अस्वलीचा दोन पिलांसह दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
एका मादी अस्वलाने अंदाजे चार महिने आधी केळझर परिसरात दोन पिल्लांना जन्म दिला होता आणि हीच अस्वल तिच्या दोन पिल्लांसह रेल्वेच्या धडकेत मारले गेल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
इंग्रजकालीन असलेला बीएनआर पॅसेंजरचा हा मार्ग अतिशय घनदाट जंगलाचा आहे आणि या मार्गावर रेल्वेला वारंवार गाडी हळू नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचनांचं पालन न केल्यामुळे आतापर्यंत या रेल्वेमार्गावर वाघ, बिबट्या आणि गव्यासारख्या जंगली प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement