एक्स्प्लोर
चंद्रपुरातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या जाळ्यात
‘बंटी-बबली’ फिल्म स्टाईल चोऱ्या करणारं एक जोडपं चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडलं आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंद असलेली घरे हेरुन घरफोड्या करत किंमती दागिने आणि वस्तू चोरणाऱ्या एका जोडप्याला चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे.
चंद्रपूर : ‘बंटी-बबली’ फिल्म स्टाईल चोऱ्या करणारं एक जोडपं चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडलं आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंद असलेली घरे हेरुन घरफोड्या करत किंमती दागिने आणि वस्तू चोरणाऱ्या एका जोडप्याला चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे.
‘बंटी-बबली’ नावानेच हे जोडपं गुन्हे वर्तुळात कुख्यात असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या दागिन्यांचा मोठा ऐवज जप्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राधाकृष्ण टॉकीज परिसरातील एका घरी चोरी झाली होती. या घरफोडीमध्ये एक महिला आणि पुरुष असल्याचा सुगावा लागला.
पोलिसांनी बल्लारपूर शहरातील वास्तव्याला असलेल्या एका घरफोड्या जोडप्याचा माग काढला असताना हे जोडपे सध्या चंद्रपूर शहरातील सावरकर नगर भागातील एका घरी लपून वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या घरावर धाड घालून सौरभ उर्फ हाजी अब्दुल सुभान खान आणि आशा भीमराव गवई यांना अटक केली.
जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात या जोडप्याची ‘बंटी-बबली’ अशी ओळख होती. पोलिसांनी त्यांच्याकडून गेल्या काही महिन्यात चोरीला गेलेले सोन्याचे काही दागिने जप्त केले असून एकूण 11 गुन्हे दाखल असलेल्या या जोडप्याच्या चौकशीतून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याचा अंदाज पोलिसाना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement