चंद्रपुरातील 'त्या' व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्हच; खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने संभ्रम
चंद्रपूर जिल्ह्यातील मृत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री झाली आहे. खासगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.
![चंद्रपुरातील 'त्या' व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्हच; खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने संभ्रम There is no corona positive in Chandrapur district चंद्रपुरातील 'त्या' व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्हच; खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने संभ्रम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/11033916/CoronaTest_WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : कोरोनाबाबत चंद्रपूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिलाला आहे. नागपूर येथे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याच्या पाच नातेवाईक आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. खाजगी प्रयोगशाळेने मृत 58 वर्षीय व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्याने जिल्हा प्रशासन पडले चिंतेत होते. पण सहाही जणांचे कोरोना अहवाल नकारात्मक आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता एकही कोरोना संशयित रुग्ण नाही. मात्र, या घटनेमुळे जिल्हा प्रशासन आता अलर्ट झालं आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर शहरातील एका 58 वर्षीय मृत व्यक्तीच्या कोरोना चाचणी बाबत धक्कादायक पेच निर्माण झाला होता. कारण, सरकारी आणि खासगी प्रयोगशाळा या दोन्हींचे अहवाल परस्पर विरोधी होते. 30 मार्चला या व्यक्तीचा नागपुरच्या मेयो रुग्णालयात मृत्यू झाला होता. या व्यक्तीला श्वसन संस्थेशी संबंधित आजार असल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने घेण्यात आले. सरकारी यंत्रणेने घेतलेल्या आणि सरकारी प्रयोगशाळेत तपासलेल्या स्त्राव चाचणीत त्या व्यक्तीला कोरोना नसल्याचा रिपोर्ट आला. मात्र, नागपूरच्या ज्या खासगी रूग्णालयात तो मेयो आधी दाखल होता, त्या रुग्णालयाने देखील 28 मार्चला घशातील नमुने मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते. धक्कादायक म्हणजे हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय
खासगी रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस गुरुवारी मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर सरकारी यंत्रणेने हा अहवाल मान्य करण्यास नकार दिला आहे. मात्र, काळजी म्हणून या मृतांच्या कुटुंबातील 5 सदस्य आणि उपचार करणारे चंद्रपुरातील फॅमिली डॉक्टर यांचे स्त्राव नमुने घेत 6 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सरकारी प्रयोगशाळेची चाचणी खरी की खासगी लॅबमधील खरी असा अजब पेच निर्माण झाला होता. मात्र, आता या सहाही व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी यावर स्पष्टीकरण दिले होतं. खासगी लॅबचे नमूने अधिकृत नाहीत. सरकारी आकडेच अधिकृत आहेत. तरीही आपण सर्व काळजी घेत आहोत. नागपूरच्या खाजगी रुग्णालयाला देखील नोटीस दिली गेल्याचे खेमणार यांनी सांगितलं.
Rural News | हिंगोली शेतकऱ्याने कोबीच्या पिकात सोडल्या शेळ्या | माझं गाव माझा जिल्हा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)