एक्स्प्लोर
सुट्ट्या दोन रुपयांचा वाद, ठाण्यात रिक्षाचालकांची प्रवाशाला मारहाण
ठाणे : ठाण्यातील रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. केवळ सुट्ट्या दोन रुपयांच्या वादातून रिक्षाचालकांनी प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे स्टेशन परिसरात घडला आहे.
ठाणे स्थानकाजवळील नौपाडा भागात प्रवासी तुषार म्हात्रे रिक्षातून उतरले. दोन रुपये सुट्टे नसल्यामुळे त्यांचा रिक्षाचालकाशी वाद झाला. वादामुळे पारा चढलेल्या रिक्षाचालकाने तुषार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर तब्बल सात सहरिक्षाचालकांना बोलावून तुषार यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत तुषार जखमी झाले. हा प्रकार पाहून पादचाऱ्यांनी रिक्षावाल्यांच्या तावडीतून तुषार यांची सुटका केली आणि आरोपी रिक्षाचालकाला बेदम चोप दिला.
अखेर आरोपी रिक्षाचालकाला नागरिकांनी नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र या प्रकारामुळे पोलिस स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. तर नौपाडा परिसरात काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती.
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement