एक्स्प्लोर

Pune Bypoll election : चिंचवडमधील ठाकरे गटाच्या 8 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; राहुल कलाटेंचा प्रचार केल्याचा ठपका

एकीकडे चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आठ शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यात आली.

Pune Bypoll Election : एकीकडे चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी (Pune Bypoll Election) सुरु आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आठ शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यात आली. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत पक्षविरोधी काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अपक्ष आमदार राहुल कलाटे यांनी बंंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळेच राहुल कलाटेंचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर हे पदाधिकारी पक्षादेशाविरोधात काम करत होते. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात रोज नेते मंडळी उपस्थित राहत आहेत. त्यासोबतच राहुल कलाटे यांचादेखील प्रचार धुमधडाक्यात सुरु आहे. त्यांच्याच प्रचारात या शिवसैनिकांनी मदत केली किंवा सहभाग नोंदवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

चिंचवडमध्ये तिरंगी लढत

चिंचवडमध्ये तिरंगी लढत आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वपक्षीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वपक्षीयांकडून या मतदार संघाच्या प्रचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेत्यांपर्यंत सर्वच नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आमदार रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी भाजपचे नेते जोमाने प्रचार यात्रेत उतरले आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन प्रचारासाठी तळ ठोकून आहेत.

आदित्य ठाकरेंचा रोड शो

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे चिंचवड आणि कसब्यात प्रचाराचा धुरळा सुरु आहे. दोन्ही पक्षांकडून कस लावण्यात येत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget