एक्स्प्लोर

संतापजनक! शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुलींनी तक्रार पेटीतून मांडली व्यथा

विद्यादानाचं काम करणाऱ्या शिक्षकांकडून आपल्या विद्यार्थिनींना वासनेचं शिकार बनवत असल्याचा घटना समोर येत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. नुकतंच नवी मुंबईतील महापालिका शाळेतील एका शिक्षकानं विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता अमरावतीतील या घटनेनं पुन्हा संतापाची लाट परसली आहे.

अमरावती :  विद्येचं दान देणाऱ्या शाळेतच एका नराधम शिक्षकाकडून तब्बल तीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका शाळेत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय नागे याला अटक केली आहे. जिल्ह्यात अवैध धंदे, मुलींवर होणारे अत्याचार असे प्रकार उघड व्हावे यासाठी जानेवारी महिन्यात पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानक आणि इतर महत्वाच्या ठिकाणी 300 तक्रार पेट्या लावल्या आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका शाळेत नराधम शिक्षक संजय नागे हा कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तीन पीडित विद्यार्थीनी सोबत अश्लील गैरवर्तन करत होता. तसेच विद्यार्थीनींनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला असता तो त्यांना मारहाणही करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान शिक्षकाच्या या गैरवर्तणुकीला कंटाळलेल्या या विद्यार्थीनींनी या शिक्षकाच्या सुरू असलेल्या कारनाम्याची तक्रार लिहून शाळेतील तक्रार पेटीत टाकून दिली. संतापजनक! शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुलींनी तक्रार पेटीतून मांडली व्यथा

प्रेमविवाह न करण्याची शपथ प्रकरणी तीन प्राध्यापक निलंबित

त्यानंतर आता जिल्ह्याभरातील तक्रार पेट्या दुसऱ्यांदा उघडल्या. या नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार या तक्रारींमधून समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ हरिबालाजी एन यांनी महिला पोलिसांचे एक विशेष पथक तयार करून संबंधित शाळेच्या तपासणीसाठी पाठवले. यावेळी तक्रारीतील तथ्य समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय नागेला अटक केली आहे. दरम्यान हे प्रकरण सरकारने गांभीर्यानं घेतलं आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे. दोषी शिक्षकावर कारवाई कडक कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

धामणगाव रेल्वेतील तरुणीच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण; आईवडिलांच्या आरोपांमुळे खळबळ

राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींना देखील नराधम आपली शिकार बनवत आहेत. यात पवित्र समजलं जाणारं गुरु शिष्याचं नात देखील बदनाम होत चाललं आहे. विद्यादानाचं काम करणाऱ्या शिक्षकांकडून आपल्या विद्यार्थिनींना वासनेचं शिकार बनवत असल्याचा घटना समोर येत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. नुकतंच नवी मुंबईतील महापालिका शाळेतील एका शिक्षकानं विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता अमरावतीतील या घटनेनं पुन्हा संतापाची लाट परसली आहे. संतापजनक! शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुलींनी तक्रार पेटीतून मांडली व्यथा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget