गोंदियाच्या बनगावातील विद्यार्थी स्मशानभूमीतील झाडावर बसून घेतात ऑनलाईन शिक्षणाचे धडे
कोरोनामुळे (CoronaVirus) दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बनगावातील लोकांच्या घरात मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेण्यासाठी चक्क स्मशान भूमीतील झाडावर चढून अभ्यास करण्याची वेळ आली आहे . तर ज्या मुला मुलींना झाडावर चढता येत नाही असे विद्यार्थ्यांना झाडाखालीच बसून अभ्यास करावा लागतो
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. अनेक पालकांकडे स्मार्ट मोबाईल नसल्याने अनेकांनी कर्ज करून मोबाईल घेतले रिचार्ज केले . मात्र घरातच नेटवर्क मिळत नसल्याने विदयार्थी शिक्षण कसे घेणार असा प्रशन पालकांमसोर निर्माण झाला आहे. अशीच काही बिकट अवस्था आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बनगावात झाली असून येथील विद्यार्थ्यांना चक्क गावातील उंच टेकडीवर असलेल्या स्मशान भूमितील वडाच्या झाडावर बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावा लागत आहे. तर ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवशी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
या संदर्भात गावातील काही उच्च शिक्षित तरुणांनी जिओ ,एअरटेल तसेच वोडाफोन या कंपन्यांकडे तक्रार केली आहे. या कंपन्यांनी नल एरिया (म्हणजे खोलगट भागात असलेले गाव ) मध्ये नेटवर्कची समस्या असल्याचे सांगत आपलाही बाजू झटकली मात्र यावर काहीही तोडगा काढण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही.
तर एकीकडे देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात जग डिजिटल होत चालले आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची काय अवस्था आहे आणि कोरोना काळात घरीच बसून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या लोकांना याचा काय फटका बसतो याकडे देखील लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे
























