एक्स्प्लोर
ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा : गडकरी
नागपुरातील ऑरेंज फेस्टीव्हलच्या उद्घाटनादरम्यान गडकरींनी मंत्र्यांना ही ताकीद दिली.
नागपूर : ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा, शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पोहोचेपर्यंत काहीच शिल्लक राहत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनावलं आहे. यावेळी व्यासपीठावर अनेक मंत्री उपस्थित होते.
नागपुरातील ऑरेंज फेस्टीव्हलच्या उद्घाटनादरम्यान गडकरींनी मंत्र्यांना ही ताकीद दिली. दरम्यान, ऑरेंज फेस्टीव्हलला यापुढे राज्याचं पर्यटन विभाग मदत करेल, अशी घोषणा याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ठिकब सिंचन योजनेसाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं. मात्र ठिबक सिंचन करणाऱ्या कंपन्या 10 रुपयांची वस्तू 20 रुपयांना विकतात. यात शेतकरी भरडले जातात. मुख्यमंत्र्यांनी आता या योजना थेट बँकेशी लिंक करण्याचं नियोजन केलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असंही गडकरी म्हणाले.
बातमीचा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement